आरमोरी : जवळच असलेल्या डोंगरगाव भुसारी येथील भोलेनाथ नारदेलवार यांच्या बैलास वाघानी हल्ला करून ठार केल्याची घटना २४ मार्च रोजी घडली. यामुळे गावकऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार भोलेनाथ नारदेलवार यांनी नेहमी प्रमाणे, आपली गुरे घराशेजारी असलेल्या गोठ्यात बांधली होती. परंतु रात्रीच्या सुमारास वाघाने बैलावर हल्ला करून जागेवरच त्याला ठार केले. उन्हाळयाचे दिवस असल्याने घरातील कुलर व पंखे चालु असल्याने नारदेलवार कुटुंबाला गुरांचा आवाज आला नाही. सकाळी उठल्यानंतर ही घटना लक्षात आली. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली असुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. या घटनेमुळे नारदेलवार यांचे अंदाजे पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले असुन वाघ गावशेजारी आल्यामुळे गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
आरमोरी: वाघाच्या हल्ल्यात बैल ठार - Batmi Express

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.