धक्कादायक! जीव गेल्यानंतरही कुऱ्हाड डोक्यातच खुपसलेली, 19 वर्षीय गुन्हेगाराची भयंकर हत्या - Batmi Express

Gondia,Gondia Crime,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,crime news,Crime Live,

Gondia,crime news,Gondia Crime,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,Crime Live,

गोंदिया 
(gondia) शहरात एका 19 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून पोलिसांनी या घटनेसंदर्भात दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित उर्फ डायमंड डोंगरे (वय 19) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृतक रोहित डोगरे हा गोंदिया शहराच्या अंगूर बगीचा भागात राहत होता. रविवारी रात्रीपासून रोहित घरून बेपत्ता झाला होता.

आज सकाळी घराजवळ असलेल्या एका मोकळ्या मैदानात रोहितचा मृतदेह आढळून आला. डोक्यात कुऱ्हाडीने वार करून रोहितची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, वार केल्यानंतर हल्लेखोरांनी डोक्यात कुऱ्हाड तशीच ठेवून पसार झाले. आज सकाळी मैदानात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रोहितचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर परिसरातील नागरिकांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत रोहित डोंगरे हा गुन्हेगारी प्रवृतीचा होता.
त्याच्यावर वेगवेगळ्या गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपीने पैश्याच्या वादातून हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून रामनगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.