नागपूर ( Crime IN Nagpur ): ताराबाई नावाच्या ६५ वर्षीय महिला शांतीनगर परिसरातील बाजारात गेल्या होत्या. तेथे त्यांना एक जवळपास ३५ वर्षीय वयाची महिला भेटली. तिने ताराबाई यांना तुम्ही कोरोनाची लस घेतली (vaccinated against corona) आहे का असे विचारले. त्यांनी होकार दिला. मग, त्या महिलेने लस घेतली आहे न मग त्याचे पैसे मिळतात, हे तुम्हाला माहीत नाही का, असे विचारले. ताराबाईना ते खरे वाटले त्यांनी महिलेवर विश्वास टाकला आणि त्यांची फसगत झाली.
आरोपी महिलेने वृद्ध महिलेला ऑटो रिक्षात बसविले. तर, तिने तुम्हाला कर्ज पाहिजे का, असाही प्रश्न विचारला. ताराबाई यांनी तेव्हा सुद्धा होकारच दिला. तर मग, तुमच्या कानातील सोन्याचे दागिने द्या. तुम्हाला कर्ज मिळवून देतो. असे म्हणून त्यांच्या कानातील दागिने काढायला लावले. कानातील दागिने घेऊन त्यांना बँकेच्या बाहेर उभे राहायला सांगितले. तर, स्वतः बँकेत जाण्याचे नाटक करून नजर चुकवून दागिने घेऊन ती चोरटी पसार झाली.
ही घटना शांतीनगर पोलीस स्टेशनच्या (Shantinagar Police Station) हद्दीत घडली आहे. ताराबाई या पाचपावली भागात राहतात. या चोरी नंतर ताराबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला, असे शांतीनगरचे पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली आहे.