Nagpur Crime: पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या नंतर पतीने स्वत:ही उचलले टोकाचे पाऊल - Batmi Express

Nagpur,crime Nagpur,Nagpur Crime,nagpur news,Nagpur Marathi News,Nagpur Today,crime in nagpur,

Nagpur,crime Nagpur,Nagpur Crime,nagpur news,Nagpur Marathi News,Nagpur Today,crime in nagpur,Maharashtra,
पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या नंतर पतीने स्वत:ही उचलले टोकाचे पाऊल

नागपूर :
 नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन आरोपी पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. आरोपी पतीने स्वत: देखील गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथे ही घटना घडली आहे.

Read Also
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात ही घटना घडली आहे. मृतक व्यक्तीचे नाव विलास गवते असल्याची माहिती समोर आली आहे. विलास गवते याने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून विलास गवते या व्यक्तीने हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. मध्यरात्री संपूर्ण गवते कुटुंब झोपलेले होते. त्यावेळी विलास गवते याने आपली पत्नी रंजना आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तिघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण सुद्धा समोर येईल. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.