नागपुरात क्षुल्लक कारणावरून दगडानं ठेचून केली मित्राची हत्या |
नागपूर ( Nagpur News ) : दारू पिऊन दोन मित्रांमध्ये क्षुल्ल्क कारणावरून वाद होऊन एकानं दुसऱ्याची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुर शहरातील कळमना परिसरात उघडकीस आली आहे. मृतकाचं नाव विक्रांत बंडगर असं आहे तर आरोपी गणेश बेडेवारला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
गणेश बेडेवार हा एक ऑटोचालक आहे तर त्याचा मित्र विक्रांत बंडगर हे दोघेही जयप्रकाश नगरात राहायचे. ओळख असल्याने ते नेहमी सोबत असूनच दारु पित होते. पण मंगळवारी दुपारच्या सुमारास गोपालनगरात दोघंही सोबत दारू पित बसले होते. विक्रांतने गणेशला विचारले तेरे भांजे का मर्डर हो गया, और तुने कूच नहि किया, म्हणून चिडवले. अशा क्षुल्ल्क कारणावरून दोघांचा वाद झाला. यात गणेशने विक्रांतला चाकूने भोसकले.