गोंदिया 🔘 रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत कुडवा येथील मोक्षधाम तलावात १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. उज्वल कुवरलाल कुंभलकर (१२) इयत्ता सहावी रा. मारोती चौक कुडवा असे मृतकाचे नाव आहे.
उज्वल हा मित्रासोबत मोक्षधाम तलाव कॉलेजटोली कुडवा येथे खेळण्यास गेला असता, तो तलावात बुडाला याची माहिती आप्पती व्यवस्थापनाला मिळताच शोध व बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. फिर्यादी कुंवरलाल बिसराम कुंभलकर (४२) रा. कुडवा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.