गोंदिया : सर्वसामान्य नागरिकांना विमान सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उड्डाण योजना कार्यान्वित आहे. त्यातूनच गोंदियाच्या बिरसी विमातळावर आज, पहिल्या प्रवासी विमानाने भरारी घेतली आहे. तर, येत्या भविष्यात याच विमानतळावरुन कार्गोची सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे घोषणात्मक प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी केले.
येथील बिरसी विमानतळावरून आज, १३ मार्च रोजी प्रवासी विमानसेवेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री सिंधीया बोलत होते. सिंधीया यांच्या हस्ते या विमान सेवेचा वर्च्युवल कार्यक्रमांने हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते, बालाघाटचे खासदार ढालसिंह बिसेन, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहागंडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार रमेश कुथे, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, विमानपतनन विभागाच्या सहसचिव उषा पाडी, प्लाय बिग कंपनीचे रतन आंभोरे, विमानपतन अधिकारी के. व्ही. बैजू, सदस्य गजेंद्र फुंडे, डॉ. प्रशांत कटरे उपस्थित होते. दरम्यान, बहुप्रतिक्षित असलेल्या प्रवासी विमानाने बिरसी विमानतळावरून आपली पहिली उड्डाण घेतली.
भाजपतर्फे मोटारसायकल रॅली
विमानसेवा सुरु होण्यापुर्वी भाजपच्यावतीने गोंदियाच्या शासकीय विश्रामगृह परिसरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खासदार सुनील मेंढे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, ओम कटरे, पंकज रहागंडाले, सुनील केलनका, घनश्याम अग्रवाल, दिपक कदम, भावना कदम, सीता रहांगडाले, संजय टेंभरे, संजय कुलकर्णी, यंशवंत मानकर, हितेश डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.