अखेर गोंदिया- बल्लारशा रेल्वे लवकरचं सुरू होणार… भाकपच्या आंदोलनाला यश
गोंदिया ( Gondia News ) :- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून गोंदिया -बल्लारशा ( gondia-ballarshah ) या मार्गावरील पॅसेंजर लोकल सेवा पूर्णत: ठप्प पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाही रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा पुर्ववत करण्यात दुर्लक्ष करीत आहे. यामुळे, या लोहमार्गावरील अनेक गावातील प्रवाशांना अडचणींना समोर जावे लागत आहे. या प्रकाराला घेऊन भाकपच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे.
गोंदिया-बल्लारशाह ( gondia-ballarshah ) मार्गावर कोरोना संकटाच्या पुर्वी ज्या प्रमाणात प्रवाशी गाड्या सुरू होत्या. त्याचप्रमाणात सुरू करण्यात, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी वडसा रेल्वे स्टेशन परिसरात तिव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. या आंदोलनांची दखल घेत रेल्वे विभागाच्या वतीने दपुम रेल्वे बिलासपुरचे उप मुख्य परिचालन व्यवस्थापक (यात्री) डॉ. एस. एन. मुखर्जी यांनी गोंदिया-बल्लारशा (gondia-ballarshah) रेल्वे मार्गावर कोरोना महामारीच्या संकटापूर्वी जितक्या संख्येत या मार्गावर पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करण्याचे प्रस्ताव रेल्वे बोर्डला पाठवलेला आहे, अशी माहिती भाकपचे राज्य सचिव मंडल सदस्य शिवकुमार गनविर यांना २४ फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
गोंदिया – बल्लारशा (gondia-ballarshah ) लोहमार्गावर पॅसेंजर गाड्या पुर्वीप्रमाणे सुरळीत करण्यासाठी गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर येथील जनतेने तीव्र आंदोलन केले होते. दरम्यान, पॅसेंजर पूर्ववत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन रेल्वेमंत्री, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते. जनतेत वाढता आक्रोश व आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्यासाठी मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा, गोंदिया-बल्लारशा लोहमार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकावर क्रमबद्ध रेल्वेचा चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा लेखी इशारा भारतीय कम्युनिस्ट पार्टीने दिला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.