Msrtc Strike: एसटी महामंडळामध्ये नोकर भरती बंद - एसटी महामंडळाचा मोठा निर्णय | Batmi Express

Be
0

Msrtc Strike,Mumbai,Maharashtra,Bus Strike
Msrtc Strike: एसटी महामंडळामध्ये नोकर भरती बंद 

Mumbai ( Msrtc Strike )
: एसटी नफ्यात येत नाही तोपर्यंत एसटीची नोकर भरती बंद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे प्रतिक्षा यादीतल्या उमेदवारांनाही संधी मिळणार नाही. महामंडळ आधीच तोट्यात आहे. त्यातच संपकाळात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खर्च नियोजनात नव्या भरतीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

एसटी विलीनीकरणासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या तीन सदस्य समिती अहवालातही महामंडळात नवीन भरतीवर निर्बंध आणण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे प्रतीक्षा यादीवरील 2200 कर्मचाऱ्यांचेही दरवाजे बंद झाले आहेत.

Most Read News

एसटी विलीनीकरणावरून गेल्या कित्येक दिवसापासून एसटी कर्मचारी संपावर आहे. महामंडळात जवळपास 87 हजार कर्मचारी आहे. त्यापैकी जवळपास 61 हजार कर्मचारी संपावर आहे.  एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरन होणार नसल्याने एसटी कर्मचारी आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, परिवहनमंत्री अनिल परब यांनीही निर्वाणीचा इशारा दिला आहे. दिलेल्या नवीन मुदतीत संपावरील कर्मचारी सेवेवर हजर झाले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->