'
30 seconds remaining
Skip Ad >

आता कसं! डोंबिवली स्टेशनवर कपलचं उतू गेलं प्रेम, भर गर्दीत केलं किस! जीआरपीनं केला गुन्हा दाखल - Batmi Express

0


डोंबिवली :
 कालपासून रेल्वेस्टेशन वर कपलचा किसिंग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली रेल्वे स्थानकावर (Dombivli) हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हा  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीत प्लॅटफॉर्मवरच प्रेमी युगुल रोमान्स (Couple Kissing ) करत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे.  तरुण-तरुणी एकमेकांच्या मिठीत शिरुन किसिंग करत असल्याचं पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे काही प्रवाशांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

Read Also

प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहून तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारत आहेत आणि चुंबन घेत आहेत, असं व्हिडीओमध्ये दिसतं. 21 सेकंदांच्या या व्हिडीओत स्टेशनवरील अनाऊन्समेंटही ऐकू येते. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेली लोकल 11 वाजून 4 मिनिटांची.. इतक्या उद्घोषणेनंतर व्हिडीओ थांबतो.

वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या डोंबिवलीत आता असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. कोणी यावर टीका करताना दिसत आहे, तर कोणी या व्हिडीओमध्ये गैर काय, असा सवाल विचारत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×