चंद्रपूर जिल्ह्यात २२० गुन्ह्यातील तब्बल २० लाखाच्या अवैध दारूवर चालविला बुलडोजर - Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,Maharashtra,

२२० गुन्ह्यातील तब्बल २० लाखाच्या अवैध दारूवर चालविला बुलडोजर

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील २२० गुन्ह्यातील १९ लाख २० हजार ९०० रूपयांच्या दारूसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीत बुलडोजर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला.

चंद्रपूर (Chandrapur ) : दारूबंदीच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा जप्त करण्यात आला होता. जिल्ह्यातील दारूबंदी उठली परंतू, दारूबंदीत जप्त करण्यात आलेला दारूसाठा पडूनच होता. त्यामुळे चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील २२० गुन्ह्यातील १९ लाख २० हजार ९०० रूपयांच्या दारूसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीत बुलडोजर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला.

दारूसाठा नष्ट करतांना पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राजेश मुळे, यांच्या नेतृत्वाखाली गजानन डोईफोडे व इतर रामनगर पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर पथकाने संयुक्तपणे केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.