Chandrapur Covid Cases: चंद्रपुरात आज कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर तर 3 जण कोरोनामुक्त - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,C

 

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Corona,Omicron News,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,Chandrapur Corona Cases,

Chandrapur Covid Cases: जिल्हयात गुरुवारी (दि.3) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तसेच जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात गुरुवारी  एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.  ( Chandrapur Covid )

हे देखील वाचा:

Russia Ukraine War: युक्रेनमधील 10 विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यात स्वगृही परत

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 936 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 349 झाली आहे. सध्या 20 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 80 हजार 66 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 79 हजार 256 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.