'
30 seconds remaining
Skip Ad >

आला रे वाघ आला! वाघ समोर दिसताच उडाली वृद्धाची भंबेरी: सालमारा-कनेरी मार्गावरील सर्वच जण थरार - Batmi Express

0

Armori,Armori News,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,

आरमोरी
: तालुक्यातील सालमारा ते कनेरी मार्गावर सायकलने जात असताना अचानक समोर वाघ आला. त्यामुळे सायकलने जाणाऱ्या वृद्धाची एकच भंबेरी उडाली. वाघ समोर दिसताच साक्षात मृत्यूचे दर्शन झाल्याचा अनुभव त्या वृद्धाला आला. सालमारा येथील मुखरु कुमरे (७०) हे मंगळवारला दुपारी १२ वाजता दरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरुन सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपढे पट्टेदार वाघ अवतरला. त्यामुळे कुमरे यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी कशीबशी सायकल थांबवत मोहफुलाच्या झाडाजवळ सायकल फेकून दिली.

स्वतः झाडाच्या बुंध्याच्या आश्रयाने उभे राहिले. वाघ आणि त्यांच्यात अवघ्या १५ फुटांचे अंतर होते. ते एकमेकांकडे ५ ते १० मिनीटे बघत राहिले. आता आपला मृत्यू अटळ आहे, असे कुमरे यांना वाटत असतानाच वाघ हळूहळू तेथून निघून गेला. यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय कुमरे यांना आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×