मुर्झा ते तिडका रस्त्यावर वाघाचे दर्शन
लाखांदुर तालुक्यात मुर्झा ते तिडका या घनदाट जंगलातील 5 की मी असलेल्या रस्त्यावर तिडका येथून पारडी येथे येत असलेल्या दुचाकीस्वारांना सायंकाळी 7 च्या सुमारास वाघाचे दर्शन झाले असल्याची घटना आज घडली. ( Tiger sighting on Murza to Tidka road )
सध्या लाखांदुर तालुक्यात वाघाचे दर्शन सर्वत्र होत असून नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. रोज कुठे ना कुठे वाघाचे दर्शन होत असल्याचे दिसून येत आहे. मागील 1 महिन्यापासून वाघाने धुडगूस घालून अनेक गावातील शेळी, जनावरे, कुत्रे, कोबड्या, फस्त केल्या असून दहेगाव जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या लाखांदुर येथील एका इसमावर हल्ला करून त्याला ठार केल्याचेही ताजीची घटना आहे.
मात्र लाखांदुर तालुक्यातील जंगलात किती वाघ आहेत याची वनविभागाकडे माहिती नाही. साकोली, लाखांदुर हा मुख्य मार्ग सायंकाळी साडेसहाच्या नंतर पुर्णतः वाघाच्या दहशतीमुळे बंद होत आहे. मुर्झा ते तिडका हा 5 की मी रस्त हा दहेगाव जंगल परिसरात असून हा रस्ता अर्जुनी, येथे जाण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक याच रस्त्याने रात्री बे रात्री ये जा करीत असतात.