आत्महत्या | ''सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय'' अशी सुसाईट नोट लिहून जवानाची आत्महत्या | Batmi Express

Be
0

 जवानाची आत्महत्या 

आत्महत्या  
"सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय' असं लिहून सुसाईट नोट व व्हिडिओ भावाला पाठवत 25 वर्षीय भारतीय सेनेतील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबळजनक घटना घडली आहे. त्यांच्यावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. (Soldier commits suicide by writing suicide note )

धुळे लामकानी येथील भारतीय सेनेतील जवान गोरख नानाभाऊ शेलार ऊर्फ गौतम (वय २५) हे भारतीय सेनेत पुणे येथील आर्मड फोर्स मेडिकल कॉलेजात शिपाई पदावर होते. चार वर्षांपूर्वी २०१७ साली भारतीय सैन्यात गोरख हे भरती झाले होते. गावात नम्र आणि शांत स्वभावी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी काल सकाळी गळफास घेत आत्महत्या केली.

हे देखील वाचा:

एकीला केलं गर्भवती तर दुसरीसोबत केलं लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी केली नवरदेवाची 'उचलबांगडी'

जवान गोरख यांनी गळफास घेण्यापूर्वी आपल्या भावाला व्हिडिओ व सुसाईड नोट पाठवली होती. "सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय" अशी सुरुवात करत मोठा भाऊ केशवला व्हिडिओ आणि सुसाईट नोट पाठवून गळफास घेतला.

ड्युटीच्या ठिकाणी आत्महत्येची घटना घडल्याने त्यांच्या युनिटतर्फे संपूर्णता चौकशी करून दोषींवर पुणे येथील वानोडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. व त्यानंतर गोरख यांचे शवविच्छेदन करून आज दुपारी प्रेत ताब्यात देण्यात आले. 

गोरख यांचे वडील नानाभाऊ तानका शेलार हे शेतकरी होते. परंतू त्यांनी देखील यापूर्वी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली होती आणि आता गोरख यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना समजताच लामकानी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->