पुणे ■ एका नराधमाने 11 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने वारंवार बलात्कार केला. या सर्व प्रकारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सोनू उर्फ सिद्राम ज्ञानेश्वर भालेराव (वय 25) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हे देखील वाचा:
पीडित मुलीचे कुटुंब हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. आई-वडील आणि बहिण भावासह ती लोणी काळभोर परिसरात राहते. वडील मोलमजुरी करतात तर आई घरकाम करून चरितार्थ चालवत.
त्यानंतर तिची विचारपूस केली असता हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी सिद्धाराम भालेराव हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा ओळखीचा आहे. त्यामुळे त्याचे घरी येणे-जाणे होते. एके दिवशी अल्पवयीन तरुणी घरी भांडी घासत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून बाथरूममध्ये ओढत नेले आणि रुमालाने तोंड बांधून बलात्कार केला.
हे देखील वाचा:
| ''सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय'' अशी सुसाईट नोट लिहून जवानाची आत्महत्या
या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.