दहशतवाद्यांशी चकमकीत लढा देताना सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण शहीद झाले आहे. जम्मू- काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये रोमितचा समावेश आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. (Sangli's son dies while fighting terrorists )
शोपियां जिल्ह्यातील जैनापुरातील चेरमार्ग भागात आज दुपारी ही चकमक झाल्याची माहिती मिळत आहे. वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण (वय 23) यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.
जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये शिगाव गावचे सुपुत्र राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.