'
30 seconds remaining
Skip Ad >

नागपूर : यो यो हनीसिंग नागपूर पोलिसांपुढे हजर, तब्बल साडेचार तास दिले आवाजाचे नमुने | Batmi Express

0

Nagpur,Nagpur News,Nagpur Today,Nagpur LIve,Nagpur Live Coverrage,Nagpur LIve News,Bollywood,
यो यो हनीसिंग नागपूर पोलिसांपुढे हजर

नागपूर (Nagpur )
: पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग (Honey Singh) हा अश्लील गाण्यांचे गायन करून ते युट्यूबवर अपलोड करतो याबद्दल व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनी सिंगविरुद्ध पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पाचपावली पोलिस ठाण्यामध्ये त्याला हजर (Attend the police station) राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने (Sessions Court) दिले होते. पोलिसांनी १० जानेवारी २०२२ रोजी हनी सिंगला पत्र पाठवले आणि २५ जानेवारी २०२२ रोजी पोलिस ठाण्यात बोलावले होते. मात्र, हनी सिंगने (Honey Singh) त्या पत्राचे उत्तर देत आपण पोलिस ठाण्यात येण्यास असमर्थ असल्याची कारणे दिली. पोलिसांनी ही बाब संबंधित सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तर, हनी सिंग तपासादरम्यान सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला होता.

तर, प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासात आवाजाचे नमुने देण्यासाठी यो यो हनी सिंगला (Honey Singh) १२ फेब्रुवारीला पाचपावली पोलिसांपुढे हजर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. या वेळी टाळाटाळ न करता, अखेर शनिवारी उशिरा तो नागपुरात आला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त राजमाने यांच्या समोर हनी सिंग याने आवाजाचे नमुने दिले आहे.

यो यो हनीसिंग (Honey Singh) याला न्यायालयाने १२ तारखेला त्याला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, शनिवारी रात्री उशिरा आल्याने तो पाचपावली पोलिस ठाण्यात पोहचू शकला नाही. त्यामुळे, तो रविवारी सकाळी ठाण्यात पोहोचला. मात्र, येथे त्याने सुरक्षेचे कारण देत, ठाण्यात येण्यास नकार दिला. त्यामुळे, त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त राजमाने यांच्या कार्यालयात बोलाविण्यात आले होते. दुपारी दीड वाजता तो कोतवाली ठाण्यात हजार झाला. त्यावेळी, त्याच्यासोबत त्याचे वकीला सुद्धा उपस्थित होते. तर, पोलिसांनी त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले. तर, तब्बल साडेचार तासानंतर सायंकाळी सहा वाजता त्याला सोडण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×