गडचिरोली : धानोरा, चामोर्शी, एटापल्लीत काँग्रेसचा झेंडा तर कुरखेड्यात काँग्रेस- शिवसेना युतीची सत्ता | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Etapalli,Chamorshi,Dhanora,kurkheda,

धानोरा, चामोर्शी, एटापल्लीत काँग्रेसचा झेंडा तर कुरखेड्यात काँग्रेस- शिवसेना युतीची सत्ता

गडचिरोली
: जिल्ह्यातील नऊ नगरपंचायत पैकी पाच नगरपंचातीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक 14 फेब्रुवारी रोजी पार पडली असून धानोरा, चामोर्शी, एटापल्ली नगरपंचायत वर काँग्रेस चा झेंडा फडकला आहे. तर कुरखेडा नगरपंचायत मध्ये काँग्रेस-शिवसेना युती चे नगराध्यक्ष झाले आहे.

हे देखील वाचा:

चंद्रपूर : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

धानोरा नगरपंचायतीत  नगराध्यक्ष म्हणून पौर्णिमा भास्कर सयाम, चामोर्शीत नगराध्यक्ष म्हणून जयश्री वायलालवार, एटापल्लीत नगराध्यक्ष म्हणून दिपयंती निजान पेंदाम आणि कुरखेडा नगरपंचायत मध्ये अनिता बोरकर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झालेली असून काँगेस मध्ये नवचैतन्य निर्माण होऊन जिल्हा सद्या काँग्रेसमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ह्या सम्पूर्ण यशाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा आंनद द्विगुणित झाला असून येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकित देखील काँग्रेस  कार्यकर्ते अधिक ताकतीने व आत्मविश्वासाने कामाला लागतील व पक्षाला भरगोस यश मिळवून देतील असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.