नागपूर: जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला जन्मठेप - Batmi Express

Be
0

Nagpur,Nagpur News,crime Nagpur,crime in nagpur,Nagpur LIve,Nagpur LIve News,Nagpur Today,Nagpur Rape,Rape,

नागपूर ( Nagpur Crime ): आरोपी मुलगा ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला सासरी राहणे कठीण झाले. परिणामी, तिने या घटनेच्या तीन वर्षापूर्वी घटस्फोट घेतला. 

पीडित आई धुणीभांडी करून जीवन जगते. ती आरोपीचीही काळजी घेत होती. असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने ताळतंत्र सोडून आईलाच वासनेची शिकार केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. 

हे देखील वाचा:

आईने  स्वतःच्याच मुलीला बलात्कार करायला लावलं! एकदाच नाही तर अनेकवेळा बलात्कार

न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांचे बयान आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->