गोंदिया: एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या विद्यार्थिनीची हत्या... ट्यूशनहून घरी परतताना भररस्त्यात खून | Batmi Express

Gondia,Gondia Live News,gondia news,Gondia Crime,Crime,crime news,

Gondia,Gondia Live News,gondia news,Gondia Crime,Crime,crime news,

गोंदिया
:- एकतर्फी प्रेमातून अकराव्या वर्गात शिकणाऱ्या प्रियसीची आरोपी प्रियकराने हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चिरामणटोला येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री हरिणखेडे (वय 18 ) असं मृत तरुणीचे नाव आहे. तर दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असं या नराधम आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या माथेफिरू तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील वाचा:

आईने  स्वतःच्याच मुलीला बलात्कार करायला लावलं! एकदाच नाही तर अनेकवेळा बलात्कार

आरोपी गणेश हा धनश्री हरिणखेडे या अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. दुपारी धनश्री ट्युशनवरून परत येत होती. पण घरी येत असताना काळ आपली रस्त्यात वाट पाहत आहे याची कोणतीही जाणीव धनश्रीला नव्हती. गणेशने तिचा रस्ता अडवला.

आणि तिच्याशी वाद घालू लागला. काही कळायच्या आता गणेशने सोबत आणलेल्या हातोडीने धनश्रीच्या डोक्यावर सपासप वार केले. वार वर्मी लागल्यामुळे धनश्री जागेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. आरोपी गणेश हा कित्येक वर्षांपासून धनश्रीकडे प्रेमासाठी तगादा लावत होता.

हे देखील वाचा:

मात्र धनश्रीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या या माथेफिरू गणेशने आज हल्ला केला. हत्या केल्यानंतर आरोपीला गावातील लोकांनी घेराव घातला असून लोकांचा जमाव पाहता आरोपीने स्वतःला हातोडीने वार करत जखमी करून घेतले. मात्र, लोकांनी आरोपीला ताब्यात देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.