शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू |
Ahmednagar | शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहित पती- पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पतीला वाचविण्यासाठी पत्नीने पाण्यात उडी मारली; परंतु यात त्यांचा मृत्यू झाला. कोपरगांव तालुक्यातील आंचलगाव शिवारात शिंदे कुटुंबियांच्या घरजवळच शेततळे आहे. नेहमीप्रमाणे पूजा शिंदे (वय २२) आणि निलेश शिंदे (वय २७) दोघे जनावरांसाठी पाणी आणण्यासाठी गेले होते. ( Husband and wife drown in farm )
यावेळी निलेशचा तळ्यातील प्लास्टिकच्या कागदावरून पाय घसरून तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी पूजाने पाण्यात उडी मारली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडवून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस घटनास्थळी दाखल होत मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगावातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.