ब्रह्मपुरी | बिबट्याचे अवयव विकणाऱ्याला, ब्रह्मपुरीतील एका आरोपीला अटक | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur News Live,Crime,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur News Live,Crime,Chandrapur Today,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,
बिबट्याचे अवयव विकणाऱ्याला, ब्रह्मपुरीतील एका आरोपीला अटक

ब्रह्मपुरी 
(Bramhapuri ) बिबट्याची नखे, दात आणि मिशा या अवयवांची तस्करी करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला नागपूर व भंडारा वन विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे.

रंगनाथ शंकर मातेरे असे या आरोपीचे नाव असून तो बोरगाव (ता. ब्रह्मपुरी, चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. पथकाने त्याच्याकडून बिबट्याच्या २१ मिशा, २१ नखे आणि १२ दात जप्त केले. यात चार सुळे दातांचाही समावेश आहे.

हे देखील वाचा:

गडचिरोली | कौतुकास्पद! माहिती मिळताच अवघ्या एका तासात थांबवीला बालविवाह #GadchiroliPolice


भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक तयार केले आणि सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून अवयव जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.