तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Guideline: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सुचना जारी - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Corona,Chandrapur Lockdown,Omicron News,Chandrapur Corona News,Maharashtra,Omycron,Chandrapur Lo

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Corona,Chandrapur Lockdown,Omicron News,Chandrapur Corona News,Maharashtra,Omycron,Chandrapur Lockdown News,
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सुचना जारी 

Chandrapur Guideline: 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दरवर्षी मोठया उत्साहाने साजरी केला जाते. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करता स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत.

कोव्हीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रकाअन्वये  दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. दि. 19 फेब्रुवारी, 2022  रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) साजरी करत असतांना शिवज्योत वाहण्याकरिता 200 भाविकांना तर शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.      


प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला,प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करतांना त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.


कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.