मुल-चंद्रपूर मार्गांवर प्रवाशी ट्रॅव्हल्सला आग
मुल (Mul ) | चंद्रपूर-मुल ( Chandrapur - Mul ) रोडवरील लोहारा गावाजवळ चालत्या खाजगी ट्रॅव्हल्सने (travels) अचानक पेट (Fire ) घेतल्याने पूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना 8 फेब्रुवारी 2022 ला दुपारच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवित हानी झाली नसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
हे देखील वाचा:
|चंद्रपुर | जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणारी कृष्णा कंपनीची धावती ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून ट्रॅव्हल्स मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पुढील तपास करीत आहेत.