Chandrapur News: बालसाधकांनी जाणून घेतली पंतप्रधान मोदींची मन की बात |
चंद्रपूर ( Chandrapur News ) : भारतीय जनता पार्टी,महानगरच्या आध्यात्मिक मोर्चा तर्फे रविवार(27 फरवरी)ला वेदमाता गायत्री शक्तीपीठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या आयोजनाचा जिल्ह्यातून आलेल्या बालसाधकांनी लाभ घेतला.
हे देखील वाचा:
|चंद्रपूरने आपला सुपुत्र गमावला! | Chandrapur lost his son!
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,आध्यात्मिक मोर्चा विदर्भ संयोजक शिल्पा देशकर,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,आध्यात्मिक मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ शैलेंद्र शुक्ला,आत्मनिर्भर भारत अध्यक्ष किरण बुटले,प्रज्ञा बोरगमवार,मंजुश्री कासनगोट्टूवार,डॉ दीपक भट्टाचार्य,वासुदेव राठोड,अशोक शर्मा,संजय मिश्रा,संदीप दीक्षित,मनोहर टहलियानी,पुरुषोत्तम सहारे,दिनकर खोब्रागडे,रामकुमार अकापेल्लीवार,मनोज मालवीय यांची प्रसमुख्याने उपस्थिती होती.यावेळी बालसाधकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन डॉ शैलेंद्र शुक्ला यांनी केले,तर कासनगोट्टूवार यांनी आभार मानले.प्रास्ताविकात डॉ भट्टाचार्य यांनी,मन की बात,कार्यक्रमाबाबत माहीती दिली.
हे देखील वाचा:
|ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला
पंतप्रधान मोदींनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेछा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मराठी भाषा गौरव दिनावर बोलताना सर्व ,महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जगातील सर्वात जुनी भाषा म्हणून तमिळ, तर जगातील सर्वात बोलल्या जाणाऱ्या भाषेंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिंदीचाही गौरव केलाय. यावेळी त्यांनी मातृभाषा, आईप्रमाणे आपलं जीवन घडवते असं मत व्यक्त केलं.जशी आपली आई आपलं आयुष्य घडवते, तशीच मातृभाषा आपलं जीवन घडवते. भारतात जगातील सर्वात जुनी भाषा असलेली तमिळ भाषा आहे.2019 मध्ये हिंदी जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती. असे ही ते म्हणाले.विद्यार्थ्यानी नवीन कल्पनांना साकार करण्यासाठी प्रयोगशील असावे असे ते,म्हणाले.
आध्यात्मिकतेला विज्ञानाची जोड द्या...डॉ मंगेश गुलवाडे,,.
यावेळी बोलताना डॉ.गुलवाडे म्हणाले,बालपणी झालेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी असते.त्या संस्कारातून आपण घडत जातो.साधकांच्या आध्यात्मिकतेला विज्ञानाची जोड दिली तर,दिव्य समाजाची निर्मिती होऊ शकते.हा या देशाचा इतिहास आहे.म्हणून आध्यात्मिकतेला विज्ञानाची जोड द्या,असे ते म्हणाले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.