जिना मरना तेरे संग! पत्नीसाठी पतीने केले बिबट्यासोबत लढाई |
औरंगाबाद:- एका पतीने पत्नीच्या प्रेमासाठी (Love) वाट्टेल ते असं आपण अनेकदा ऐकलं असेल. एक दुजे के लिये, जिना मरना तेरे संग हे असं चित्रपटही आपल्याला अशा घटना नंतर यांची आठवणयेतो. पण त्या चित्रपटातील क्षण प्रत्यक्ष आयुष्यात घडू शकतं हे म्हटल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. पत्नीच्या प्रेमासाठी एका पतीने बिबट्याशी झुंज दिली आहे.
औरंगाबादमधील वैजापूर (Vaijapur) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या काळोखात कापूसवाडगाव येथील रहिवासी परशूराम मुठ्ठे हे पत्नी सोबत दुचाकी वाहनावरुन गावी परत येत असताना बिबट्याने धावत्या दुचाकीवर हल्ला केला आहे.
या हल्ल्यात बिबट्याने महिलेचे अनेक लचके तोडले. हे पाहत असताना परशूराम मुठ्ठे यांनी प्रचंड आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलावून घेतले. नागरिकांचा गोंगाट ऐकून बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने महिला सुखरूप आहे.
हल्ला झालेल्या महिलेला तात्काळ वैजापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेवर उपचार सुरू आहेत. दरम्यान बिबट्याने महिलेवर हल्ला केल्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.