Gadchiroli Markanda Yatra Canceled - मार्कंडा व चपराळा देवस्थान यात्रेला परवानगी द्या : आ. डॉ. देवराव होळी - Batmi Express

Gadchiroli Markanda Yatra Canceled,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,


गडचिरोली (Gadchiroli  Markanda Yatra Canceled  ) मार्कंडादेव व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेला काल अचानक मनाई आदेश काढल्याने या आदेशाच्या विरोधात व व यात्रेला तातडीने परवानगी  देण्याचा आदेश काढण्यात यावा याकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात मार्कंडा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर भाविक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य आंदोलन करण्यात आले.

हे देखील वाचा:

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा सह सर्व यात्रा रद्द

मागील दोन वर्षापासून यात्रा भरण्यास बंदी असताना या वर्षी प्रशासनाने यात्रेला परवानगी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या निमित्ताने अनेकांनी त्या ठिकाणी तयारीही केली होती. परंतु काल अचानक या यात्रांना मनाई आदेश काढण्यात आल्याने भाविकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सदर मनाई आदेश रद्द करून पुन्हा परवानगी देण्यात यावी  याकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात मार्कंडा देवस्थान येथे भव्य आंदोलन करण्यात आले. शासनाने  तातडीने या यात्रांना परवानगी द्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या वेळी आमदार डॉ. देवराव यांनी शासनाला केली असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना पाठवलेले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.