वैनगंगा नदीत आरमोरी येथील तरुणाचा बुडून झाला मृत्यू |
आरमोरी – ब्रम्हपुरी – आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात बुडून तरुण युवकाच्या मृत्यु झाला असल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी घडली आहे. मृतक मुलाचे नाव अभिनव दौलतराव कुथे ( Abhinav Daulatrao Kuthe ) वय वर्षे ( 23 ) असे असून आरमोरी (Armori ) येथिल रहिवाशी आहे. ( A young man from Armori drowned in Wainganga river )
सविस्तर वृतांत याप्रमाणे आहे की, अभिनव तसेच अभिनवची आई (Abhinav Mother) हे आरमोरी (Armori ) येथून नदिघाट पुलाजवळ वैनगंगा नदीपात्रात ( Wainganga river ) आंघोळ करायला आले. आई सुद्धा नदी पात्रात थोड्या पाण्यात उभी होती. मुलगा अभिनव हा जास्त पाण्यात पोहायला गेला. काही वेळ पोहतच होता मात्र दोन दिवस झाले वैनगंगा नदीपात्र पाण्याची पातळी वाढली असुन काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात लुप्त झाला. खूप वेळ झाला मात्र अभिनव पाण्याच्या बाहेर दिसला नसूनअसे निदर्शनात येत आहे की अभिनव चा मृत्यु झाला. आंघोळ करायला जाणे अभिनवच्या जीवार बेतले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.