'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रेकिंग! चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद दोषी: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा....

0

IndiaNews,India,News India,Ranchi,चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद दोषी: लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा....

चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  न्यायालयाने ५ वर्षांच्या शिक्षेसह ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या वकीलांनी सांगितले. तिथे लालूंसाठी जामीन अर्ज दाखल केला जाईल. लालूप्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे, असा युक्तिवाद केला जाईल. आम्ही न्यायालयात प्रकृतीचे कारण दिले होते, असे त्यांचे वकील म्हणाले. 

लालू प्रसाद यादव यांच्यासह या प्रकरणातील ३८ दोषींनाही सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. १५ फेब्रुवारीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.के.शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले आणि शिक्षेवरील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती.

 दरम्यान, चारा घोटाळ्याचा हा निकाल १५ फेब्रुवारीला न्यायालयाने दिला. विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवले होते. त्याचबरोबर २४ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×