Chandrapur Crime: 7 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच केला लैगिक अत्याचार | Batmi Express

Korpana Crime,Chandrapur News,Chandrapur,Rape,Chandrapur Live,Crime,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Korpana,Chandrapur News Live,
Korpana Crime,Chandrapur News,Chandrapur,Rape,Chandrapur Live,Crime,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Korpana,Chandrapur News Live,
7 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच केला लैगिक अत्याचार

कोरपना:- कोरपना तालुक्यात मावस भावानेच अल्पवयीन बहिणीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवार दिनांक १५ ला सकाळच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार 7 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी 21 वर्षीय मावसभावा जवळ सोबत घरातील खाटेवर झोपून होते. पीडितीचे आई-वडील कामात असताना नराधम मावसभावाने संधी साधून अल्पवयीन बहिणीवरच लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या कपड्यावर रक्त दिसल्यानंतर तिला आई वडीलानी कोरपना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरने तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे लक्षात आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेचा तपास करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी आरोपी विरोधात कलम ३७६ अ ब भांदवी ६ पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सदाशिव ढाकणे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.