चंद्रपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प आजपासून पुढील आदेशपर्यंत बंद करण्यात आला आहे. देशासहित राज्यात कोरोना विक्राळ रूप धारण करीत असून दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या ( Covid-19 cases increase ) वाढत आहे.
सदर परिस्थिती बघता ताडोबा प्रशासनाच्या वतीने ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी तसा आदेश जारी केला आहे.
ज्या पर्यटकांनी सफारी साठी ऑनलाइन बुकिंग केली असेल त्यांचे पैसे त्यांना ई वॉलेट द्वारे 10 दिवसात परत मिळणार अशी माहिती देण्यात आली आहे.