'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli's Ritika Gohane selected for Istro trip | इस्त्रो सहलीकरीता गडचिरोलीच्या रितीका गोहणेची निवड | Batmi Express

0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,Gadchiroli,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

गडचिरोली  ( Gadchiroli ) :-
Istro trip नोबेल फाऊंडेशन, भरारी फाऊंडेशन व नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था जळगाव व्दारा आयोजीत नोबेल सायन्स् टँलेंट सर्च परीक्षा (NSTS) २०२१ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये गडचिरोली येथील वसंत विद्यालयची विद्यार्थीनी कु.रितीका सुधीर गोहणे हिची इस्त्रो सहलीसाठी निवड करण्यात आली.

नोबेल सायन्स् टँलेंट सर्च परीक्षा (NSTS) परीक्षा ही महाराष्ट्रातील विज्ञान व संशोधन क्षेत्रामध्ये मुलांना घडविणारी अभिनव लेखी परीक्षा आहे. ही परीक्षा ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो), आयआयटी, आयआयएम अहमदाबाद यासारख्या उच्च् शिक्षण संस्था व संशोधन संस्थाची विनाशुल्क् सहल घडविते. सन २०२१ मध्ये या परीक्षेत वर्ग ५ते ७, ८ ते १० व ११ ते १२ या तीन गटात संपूर्ण राज्य्भरातील ५९०० विद्यार्थी समाविष्ट झाले. राज्भ्रातील विविध परीक्षा केंद्रावर पुर्व परीक्षा, ऐडव्हॉन्स् परीक्षा व मुलाख्त या व्दारे अंतीम ५३ विद्यार्थ्यांची इस्त्रो सहलीकरीता Istro trip निवड करण्यात आली.

विशेष्त: या परीक्षेत विदर्भातील फक्त् ४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. त्यामध्ये गडचिरोली सारख्या आदिवासीबहूल जिल्ह्यातील वसंत विद्यालय गडचिरोलीची विद्यार्थीनी कु.रितीका सुधीर गोहणे या एकमेव विद्यार्थीनीची निवड झाली आहे. कोरोना प्रतीबंध उठविल्यानंतर सहलीचे आयोजन करण्यात येणारआहे. २०२२ ची नोबेल सायन्स् टँलेंट सर्च परीक्षा (NSTS) नोंदणी १२ जानेवारी पासून सुरु होत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे प्रमुख जयदीप पाटील यांनी केले आहे. या यशाचे श्रेय रितीकाने शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनादिले आहे. या यशाबद्दल चांदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोकसिंह ठाकूर , उपाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, सचिव अशोक पुल्लावार , मुख्याध्यापक शेमदेव चाफले तसेचसर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×