चंद्रपूर ( Chandrapur Rain Updates ):- मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 10 व 11 जानेवारी 2022 रोजी दोन दिवसासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
तसेच जिल्ह्यातील एक ते दोन ठिकाणी वादळी विजेच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 11 जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी धान्यांची उचित काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.