'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूरः अल्पवयीन बालिकेचा किराणा दुकानात विनयभंग - Batmi Express

0
Chandrapur News,Chandrapur,Rape,Rajura,Chandrapur Live,Rape News,Chandrapur Crime,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News LiveChandrapur Today,

राजुरा ( Rajura ) :- राजुरा तालुक्यातील रामपूर-सहकार नगर येथील येथील एका किराणा दुकानदाराने दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या एका बारा वर्षीय मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी किराणा दुकान व्यावसायिकाविरुद्ध विनयभंग आणि पास्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलिसांनी राधेश्याम पन्नास वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ( Minor Girl Molested in Grocery Store )

सास्ती टाऊनशिपच्या बाजूला रस्त्यावर राधेश्याम किराणा दुकान आहे. या दुकानात शेजारच्या रामपूर, सहकार नगर येथील नागरिक किराणा व अन्य आवश्यक वस्तू घेण्यास येत असतात. आज सकाळी नऊ वाजता एक अल्पवयीन मुलगी वही आणण्यासाठी दुकानात आली होती. राधेश्याम नामक दुकानदाराने मुलीला वही पाहण्यासाठी दुकानाच्या आत बोलावून तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडून तिला छातीवर भार देत कवटाळले. यामुळे मुलगी घाबरून रडायला लागली. तेव्हा त्याने तिला चॉकलेट देऊन सोडले. या मुलीने घरी रडत येऊन आपल्या आईला घटनेची माहिती दिली.

या घटनेची तक्रार या अल्पवयीन मुलीच्या आईने राजुरा पोलीस ठाण्यात केली. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विनयभंग कलम 354 ए (1) आणि बालकांचे लैंगिक अपराधा पासून सुरक्षा संरक्षण अधिनियम 2012 यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी किराणा व्यावसायिकास पोलिसांनी अटक केली. दरम्यान यामुळे या भागात या दुकानदारांविरुद्ध मोठा रोष निर्माण झाला. दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×