'
30 seconds remaining
Skip Ad >

Maharashtra School Reopened From Today | आजपासून राज्यात पहिली ते बारावीची शाळा सुरु; जाणून घ्या, शाळा कुठे सुरु, कुठे बंद - Batmi Express

0
Maharashtra School Reopened From Today ,Education News,Covid-19,Education,Maharashtra Live,Maharashtra,Mumbai News,Maharashtra News,Mumbai

Mumbai ( School Reopened )
: राज्यातील शाळा आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं, त्या पालकांनीच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये.  ( Maharashtra School Reopened From Today )

शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. मात्र, अनेक जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. 

● मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याबाबत निर्णय जाहीर केला आहे. 
● पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. 
● नागपुरात 26 जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. 
● नाशिकमधील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. 
● यवतमाळ जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 9 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
● धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता नववी ते 12 च्या 420 शाळा सुरू होणार आहे. नववी ते 12 च्या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून पहिल्या आठवड्यानंतर उर्वरित शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. 
● जालना जिल्ह्यात आजपासून शहरी भागातील आठवी ते 12 वीपर्यंत तर ग्रामीण भागातील पहिली ते 12 वी पर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 
● नंदुरबार जिल्ह्यात शाळा 24 जानेवारीपासून पहिली ते 12 वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत.
● वाशिम, अमरावतीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. 
● औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त दहावी, बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत. 

'ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.' - 1/20/22 2:38 PM ( News Reports ) 

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. 1/20/22 2:38 PM ( News Reports ) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×