'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपुर: देशी दारूच्या दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा - घुघुस कांग्रेसची मागणी - Batmi Express

0

घुग्घूस (चंद्रपूर) :
जिल्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध कामगार नगरीत कामगारांचा मोठा भरणा आहे.
सात वर्षाच्या बंदी नंतर आता जिल्ह्यात रीतसर दारू विक्री शुरू झाल्याने शहरात देशी - विदेशी दारू धंद्याला उत आलेला आहे. शहरात आधी पासून जवळपास सतरा वाईन बार व तीन देशी दारू भट्टी असतांना विलास भिकाजी टेंभूणे संचालक में. चिर्यस प्रा.लि. उल्हासनगर जि. ठाणा यांच्या स्थलांतरित दुकानास नगर परिषदेने परवानगी दिली असून सदर दुकान हे घुग्घूस येथील आनंद वाईन बारच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येत आहे. याठिकाणीच दहा ते पंधरा मीटर अंतरावर दिक्षा भूमी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक आहे. व तीस मीटर अंतरावर माता माऊलीचे मंदिर आहे. याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो याच परिसरात नागरिकांसाठी प्रस्तावित बगीचा व वीस फुट रस्ता आहे.

करिता सदर देशी दारूच्या विरोधात घुग्घूस शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता व गेल्या वर्षी आगस्ट महिन्यात दारू दुकानाला परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात आले होते.

असे असतांना ही सदर देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली सदर तातळीने रद्द करावी या करिता किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आले व परवानगी रद्द न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही काँग्रेसने दिला. याप्रसंगी घुग्घूस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, प्रशांत सारोकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×