'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रेकिंग! राज्यातली दारुची दुकानंही बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं विधान, म्हणाले | Batmi Express

0

Jalna,Maharashtra Lockdown,Maharashtra Today,Omicron  Live,Omicron News,Maharashtra Live,Maharashtra Lockdown Live,Omicron,Maharashtra,Maharashtra News,Omycron,Omicron  News,
राज्यातली दारुची दुकानंही बंद होणार

जालना ( Jalna ): 
राज्यात कोरोनाच्या धोक्यामुळे आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात आता दारुची दुकानही बंद करावी लागणार, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

परंतु, शाळाही बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना दिसत आहेत. यामुळे गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल, असं टोपे यांनी म्हंटलं आहे. राज्यात ऑक्सीजनची मागणी थोडी वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

18 वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी आयसीएमआरने याबाबतीत सूचना कराव्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असही ते म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×