राज्यात काल ३६ हजार कोरोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे, याशिवाय निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिलाय.
(ads1)
मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले जातील. मात्र निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असंही त्यांनी म्हटलंय. ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही, त्यावेळेत निर्बंध आणता येतील का? याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार असून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असंही टोपे म्हणाले. मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असही टोपे म्हणाले.
(ads2)
चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १० तारखेनंतर बूस्टर डोस घ्यावा. कारण यातून नागरीकांना फक्त लस वाचवेल, अशी विनंतीही त्यांनी यावेळी नागरिकांना केलीय.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.