Maharashtra Coronavirus Live: राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 8 हजार 67 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने आठ हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.
(ads1)
हे सुद्धा वाचा
राज्यात आज आठ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 24 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आत्तापर्यंत 65 लाख 9 हजार 96 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत 454 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 157 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.