Jalna Ambad Suicide | 3 मुली, एका मुलाला घेऊन विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Batmi Express

Jalna Ambad Suicide,Jalna Ambad Suicide News,Jalna,Jalna News,suicide,suicide news,Suicide Marathi News,Maharashtra,

Jalna Ambad Suicide,Jalna Ambad Suicide News,Jalna,Jalna News,suicide,suicide news,Suicide Marathi News,Maharashtra,

जालना ( Jalna Ambad Suicide ) | अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी ही महिला तिची मुले भक्ती, ईश्वरी, अक्षरा आणि युवराज या चार मुलांसह गुरुवारपासून गायब होती. शुक्रवारी सकाळी शिवारातील गट नंबर 93 मधील विहिरीत पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.

(ads1)

Read Also:  नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत ती पळाली; गरोदर राहिल्यानंतर विवाहास नकार

घटनेची माहिती मिळताच अंबडचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, गोंदीचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत. घटनास्थळी तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर जागेवरच या पाचही मृतदेहाचे शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात आले.  

(ads1)

त्यानंतर या सर्व मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू शुक्रवार सायंकाळपर्यंत सुरू होती. पोलिसांनी या मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.