Maharashtra Coronavirus Live: राज्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच, मागील २४ तासांत वाढले ३६ हजारापेक्षा अधिक रुग्ण - Batmi Express

Be
0

Maharashtra Coronavirus Live:  राज्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात आढळले 'एवढे',Coronavirus Live,coronavirus,Maharashtra,Maharashtra Coronavirus

Maharashtra Coronavirus Live: राज्यातील कोरोनाच्या( Corona ) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

(ads1)

राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.17 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.08 इतका झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 1368 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ओमायक्रॉनचे ( Maharashtra  Omicron Cases ) 79 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात आजपर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 876 रुग्णांची नोंद झाली आहे. आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. 

ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

मुंबईत 20 हजार रुग्णांची नोंद:

मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->