कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल.
मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.