'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! 1 वर्षाचे बेवारस बाळ चार दिवसापासून पुलाखाली कडाक्याच्या थंडीत रडत होतं l Batmi Express

0

Ratnagiri,Ratnagiri Live,Ratnagiri News,Ratnagiri Crime,Ratnagiri Marathi News,Ratnagiri Batmya,Batmi Express

रत्नागिरी ( Ratnagiri ) :  जिल्ह्यात नवजात मातेच्या अत्याचाराची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील थांब्याजवळ 1 वर्षाचे बाळ 4 दिवसांपासून रडत असल्याचे आढळून आले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर घटना अशी की, पांगरी येथील हनुमान स्टॉपजवळील गावात 1 वर्षाचे बालक 4 दगडांच्या मधोमध आढळून आले. चार दिवस हे बालक याच ठिकाणी रडत होते. थंडीमुळे गारठल्याने आणि रडून रडून त्याचा घसा बसला होता. मात्र 4 दिवस संपूर्ण गावात मुलाच्या रडण्याचा आवाज आला. जनावरांचा किंवा अन्य कशाचाही आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

हे देखील वाचा:

राज्यातील महाविद्यालय 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार 

मात्र, आज सकाळी सरपंच सुनील म्हाडे यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली असता त्यांनी याबाबतची चर्चा ऐकली. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील व ग्रामस्थांसह घटनास्थळ गाठले. या ठिकाणी गेल्यावर एक स्त्री जातीचे बालक रडत होते. 4 दिवस अन्न-पाण्याशिवाय तडफडत होतं. गोठवणारी थंडी होती त्यामुळे या बालकाच्या तोंडातून आवाज येत नव्हता. ते बेशुद्ध अवस्थेत दिसत होतं.

सरपंच, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, वांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मंगेश राऊत, सीएचच्या सोनाली चव्हाण, आशा वर्कर दिक्षा जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून मुलाला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलीस दाखल झाले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×