Solapur Crime | धक्कादायक! बापानेच केला १६ महिन्यांच्या लेकीवर बलात्कार, आईने देखील दिली साथ - Batmi Express

Be
0
Solapur,Crime,Solapur Live News,Rape,Solapur Live,Solapur Live Coverrage,Solapur news,Rape News,Solapur Today,crime Solapur,Solapur Marathi News,Solapur Crime,

सोलापूर : अवघ्या १६ महिन्यांच्या पोटच्या मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार ( Father Rape ) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बलात्कारानंतर नराधम पित्यानेच चिमुकलीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न असताना लोहमार्ग पोलिसांनी बापासह चिमुकलीच्या आईलाही बेड्या ठोकल्या. सोलापुरात ही नात्यांना काळिमा फासणारी घृणास्पद घटना उघडकीस आली आहे.

(ads1)

सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसह हैदराबाद येथे राहात होती. पीडितेची आई व लहान मुलगा हे झोपी गेले असताना बापाने मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सिकंदराबाद- राजकोट एक्‍सप्रेसने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मूळगावी राजस्थानकडे मुलीचा मृतदेह घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले.

(ads2)

ट्रेनमधील प्रवाशांना संशय आल्यामुळे त्यांनी वाडी येथे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र गाडी तोपर्यंत स्टेशनवरुन पुढे निघून गेली होती. ही गाडी सोलापूर स्टेशनवर गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास पोहोचली, तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कृत्यात त्याला पत्नीचीही साथ असल्याचं उघडकीस आलं आहे. हा गुन्हा हैदराबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे) सदानंद वायसे- पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे गणेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग विभाग सोलापूर अप्पासाहेब चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->