Exam Updates HSC - SSC 2022 - मुंबई १०वी १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या पालक वर्गातून मागणी - Batmi Express

Education News,Covid-19,Education,Maharashtra Live,Omicron,Maharashtra,Mumbai News,Mumbai,HSC Board,SSC Board,10th SSC Board Exam 2022,HSC Board Exam,

Education News,Covid-19,Education,Maharashtra Live,Omicron,Maharashtra,Mumbai News,Mumbai,HSC Board,SSC Board,10th SSC Board Exam 2022,HSC Board Exam,HSC Board Exam 2022,SSC Board Exam,SSC News

Exam Updates HSC -SSC 2022 मुंबई : सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे मुंबईतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आला आहेत. तसेच निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. दरम्यान एकीकडे विक इंड लॉक डाऊनची लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या बोर्ड ऑफ लाईन (HSC & SSC Offline Examपरीक्षा घेण्याचा तयारीत आहे. याला पालक, शिक्षक तज्ञ यांनी सुधा विरोध केला आहे. सध्या कोरोणाचे रुग्ण पाहता, ऑफ लाईन परीक्षा न घेता ऑनलाईन परीक्षा घ्यावा अशी मागणी होत आहे.

(ads1)

सध्या जगभरात ओमायक्रोन या नव्या विषाणूणे थैमान मांडले आहे. देशासह राज्यात कोरूनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तसेच मुंबईत सुद्धा झपाट्याने कोरोणाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबईतील पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात काही कठोर निर्माण सुद्धा लावण्यात आले आहेत, विकएंड लॉकडाऊन  सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्यातील शाळा सुद्धा तूर्तास बंद कराव्यात व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करावे असे बोलले जात आहे.
पुढील एक दोन महिन्यात दहावी आणि बारावीचा बोर्डाच्या वार्षिक परीक्षा होणार होत्या, परंतु “सध्या कोरोनाचे परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलाव्या किंवा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या असे मुंबईतील प्रभादेवीतील पालक अरुण सावंत यांनी म्हटले आहे”, तर “सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यामुळे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवावे, व बोर्डाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेता, ऑनलाईन परीक्षा घ्याव्या किंवा परीक्षा पुढे ढकलाव्या असं बोरवली येथील पालक प्रवीण पेंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत”. तर शिक्षण कार्यकर्ता, जयंत जैन, यांनी सुधा परीक्षा पुढे ढकलव्या अशी मागणी केली आहे.

(ads1)

दरम्यान सध्या राज्यातील आणि मुंबईतील कोरोणाची परिस्थिती भयानक असताना, दुसरीकडे मात्र दहावी आणि बारावीच्या बोर्डाने परीक्षा घेण्याची तयारी जोरदार केली आहे. परीक्षा घेणार हा बोर्डाचा आग्रह कायम आहे. मात्र यावर आता संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. शिक्षण क्षेत्रातील पालक संघटना, पालक आणि शिक्षणतज्ञ यांनी सुद्धा परीक्षा पुढे ढकलाव्या किंवा ऑनलाईन घ्याव्या अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कोणत्या ऑफलाइन की ऑनलाईन स्वरुपात होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.