'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagpur Suicide | पोलिस दलातील जवानाच्या पत्नीची आत्महत्या, चिट्ठीत लिहून ठेवलं होत असं काही - Batmi Express

0

पोलिस दलातील जवानाच्या पत्नीची आत्महत्या,nagpur news,Nagpur Suicide,Nagpur,Nagpur Today,suicide,Nagpur Marathi News,Maharashtra,

नागपूर (Nagpur) :
  ‘आई, तू माझ्या मुलांचा सांभाळ कर’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानाच्या पत्नीने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी ३ वाजताच्या सुमारास शिवणगावमधील सीआरपीएफ कॅम्प येथे घडली. पूनम राजकुमार डगवार (वय ३१), असे मृतकाचे नाव आहे.

(ads1)

Read Also:  नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत ती पळाली; गरोदर राहिल्यानंतर विवाहास नकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार हे झारखंडमधील रांची येथे तैनात आहेत. पूनम या दोन मुलांसह सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहायची. २७ डिसेंबरला राजकुमार हे घरी आले. यावेळी त्यांचा पूनम यांच्यासोबत वाद झाला. राजकुमार रांचीला परतले. मंगळवारी दुपारी पूनम यांनी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

(ads1)

घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी पूनम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, आई तू माझ्या मुलांचा सांभाळ कर’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×