नागपूर (Nagpur) : मोबाइलमध्ये अश्लील चित्रफित दाखवून आठ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही खळबळजनक घटना सोनेगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ७० वर्षीय वृद्धासह दोघांना अटक केली आहे. मनोहर दौलत शेलारे (वय ७०) व निखिल बंडू नेवारे (वय २४), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. निखिल श्रमिक आहे.
(ads1)
हे सुद्धा वाचा
पीडित मुलगी पाचव्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील खासगी काम करतात. १२ डिसेंबरला मुलगी निखिलच्या घरी खेळत होती. निखिल याने तिला मोबाइलमधील अश्लील चित्रफित दाखविली. तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार मनोहर याने बघितला. त्यानेही मुलीवर अत्याचार केला. दोन दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी विचारणा केली असता अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली. मुलीच्या नातेवाइकाने सोनेगाव पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना गजाआड केले.