चंद्रपूर: वाघाच्या हल्यात युवक ठार - Batmi Express

चंद्रपूर: वाघाच्या हल्यात युवक ठार,Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Tiger Attack,Mul,Mul News,

Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Chandrapur Live,Mul,Mul News,Chandrapur News IN Marathi,Tiger Attack,
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार


मूल
:- फुलझरी वरून डोणी येथे जात असताना वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना कक्ष क्रं. 351 मध्ये घडली. भारत रामदास कोवे रा. डोणी वय 23 असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे.  

(ads1)

मूल तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डोणी येथील भारत रामदास कोवे वय 23 वर्षे हे कामानिमीत्य बाहेरगावी गेला होता, काम पुर्ण करून फुलझरी मार्गे डोणी येथे सायं. 7 वाजता दरम्यान जात असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या झडप घेत जागीच ठार केला. सदर घटना मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. 351 मध्ये घडली. 

(ads1)


वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृत्तदेह उपजिल्हा रूग्णालय मूल येथे आणण्यात आले.
घटनास्थाला वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर, जानाळाचे क्षेत्र सहा. विनोद धुर्वे, मूलचे पोलीस निरीक्षक सतिषसिंह राजपुत यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.