पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरातील देशी दारूच्या भट्टीत जमा झालेली रक्कम आपल्या गावाकडे नेत असताना भट्टीच्या दिवाणजीला घनोटी तुकूम गावानजीक चोरट्यांनी अडवून दरोडा टाकला असल्याचा बनावट प्रसंग निर्माण करून १ लाख ९२ हजार रूपयाची राबरी करणारा मास्टर्स माईंड दिवाणजी अखेर पोलिसांच्या ताब्यात अडकला.
राबरीमध्ये असलेल्या साथीदारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या प्रकरणात आणखी काही सत्य समोर येतील का या दिशेने ही पोलिस तपास करीत आहेत.